ओळख नवदुर्गेची सदरात आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर
(लीना माने कोलते)
डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर या मुळच्या पिपंरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण येथील रहिवासी आहेत. त्यांनी आकुर्डी येथील आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर येथे आयुर्वेदात व योग्य शास्त्रांमध्ये पदविका घेतली. डॉ. प्रेरणा बेरी यांनी आयुर्वेद- पंचकर्म क्षेत्रात विशेष कामगिरी केली आहे. आज अनुभवी आरोग्य विशेषज्ञ म्हणून त्यांना ओळखले जाते.दिल्ली येथे २०१८ मध्ये झालेल्या मिसेस इंडिया ब्यूटीफुल हा किताब पटकावला आहे.
लठ्ठपणा, वजनाचे व्यवस्थापन, संधिवात, स्त्री रोग, त्यांच्या समस्या, महिलांचे निरोगी आरोग्य, वंध्यत्व, सौंदर्याची काळजी आणि सर्व प्रकाराच्या पंचकर्मावर डॉ. प्रेरणा बेरी आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. योग्य आहार, जीवनशैली, योगा आणि पंचकर्म यामुळे आपण आपले सौंदर्य टिकू शकतो. महिला आरोग्य हा विषय सर्वच पातळ्यांवर दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी यावर काम केले पाहिजे. या भूमिकेतून त्यांनी ऊर्जा हेल्थकेअर मार्फत आणि डॉक्टरांच्या सहकार्यातून विवाहित महिला डॉक्टरांसाठी मेडिकल अँड मिसेस महाराष्ट्र ही स्पर्धा सुरू केली आहे.
महिलांनी ताण तणावावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. आयुर्वेद पंचकर्म आदींच्या मदतीने महिलांना तारुण्य आणि सौंदर्य ठेवता येऊ शकते. आयुर्वेद आणि आरोग्य हे दोन शब्द वेगळे होऊ शकत नाहीत. आरोग्य कसे टिकवावे, आयुष्य कसे जगावे, याचे परिपूर्ण मार्गदर्शन आयुर्वेदात मिळते. सौंदर्याच्या परिभाषेत चेहरा सुंदर असणे आवश्यक ठरते. चेहरा हे आपल्या शारीरिक मानसिक आरोग्याचे प्रतिबिंब असते. क्रीम लावून चेहऱ्यावर तकाकी येऊ शकते. लिपस्टिकने ओठाला लाली आणता येते. पण हे करताना नैसर्गिकपणे देखील या गोष्टी मिळू शकतात. सौंदर्याचा विचार करताना तो संपूर्ण शारीरिक, मानसिक, भावनिक पातळीवर केला पाहिजे, असे त्या आवर्जून सांगातात.
डॉ. प्रेरणा बेरी यांनी या निमित्ताने महिला वर्गासाठी निरोगी आरोग्य, सौदर्याविषयी मार्गदर्शन केले आहे. ते पुढीलप्रमाणे –
मासिक पाळी आणि स्त्रीया…
मानसिक प्रसन्नता आणि समाधान ही देखील सौंदर्याची प्रमुख लक्षणे आहेत. स्त्रीचे स्वास्थ्य व सौंदर्य ही नियमित निरोगी पायी आरोग्यपूर्ण गर्भारपण, प्रस्तुती मेनोपॉज या महत्त्वाच्या अवस्थांवर अवलंबून असते. आहार, त्यांच्या कामाचे स्वरूप, त्याचे तास, भूक लागणे, पोट साफ होणे, पुरेशी झोप, व्यायाम, मानसिक तान या जीवनशैलीवर आरोग्य अवलंबून असते. मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखणे योग्य नाही. त्यावर उपचार केल्या पाहिजेत. आरोग्यपूर्ण असणे गरजेचे आहे. त्यामुळे स्त्रीच्या शारीरिक मानसिक व सांभाळला जातो. या काळात अति हसणे, बोलणे व श्रमाची कामे टाळावीत. प्रवास टाळावा. कारण शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर आपले बाह्य सौंदर्य अवलंबून असते.
तसेच त्या हर्बल कॉस्मेटिक वर्कशॉप ही घेतात व मी अँड बेबी क्लासेस ही घेतात. गर्भअवस्थेतील आहार,व्यायाम,योगा तणाव मुक्ती पद्दत,प्रसूती प्रक्रिया, स्तनपान,नवजात शिशुची काळजी,प्रस्तुती झाल्यानंतरची काळजी आदींवर योग्य ते मार्गदर्शन करतात.
काही नियम पाळल्यास निरोगी जीवन
केस गळणे, पांढरे होणे, कोंडा या सामान्य समस्या आहेत. शाम्पू कंडिशनरचा अतिरेक जेवणात मीठ किंवा आंबट पदार्थांचा अधिक वापर, मानसिक तान अवेळी जेवण, पाळीच्या तक्रारी, पोषक आहाराचा अभाव, जागरण, केसांना तेलाने कमी प्रमाणात रक्तपुरवठा यामुळे या समस्या निर्माण होतात. आहाराचे नियम पाळल्यास पचनसंस्थेचे कार्य नीट चालू राहते. त्यामुळे त्वचा केस यांचेही आरोग्य उत्तम राहते. ऋतूनुसार मोरावळा, गुलकंद, शतावरी, कल्प सेवन करावा. केसांना दही, कोरफडीचा गर इत्यादी नियमीत लावल्याने केसांना चमक टिकून राहते.
आहार कसा घ्यावा ?
जेवणाची सुरुवात गोड पदार्थाने करावी. जेवणाचा शेवट ताक किंवा दही-भात आने करावा. जेवण नेहमी गरम, ताजे व स्निग्ध असावे. जेवताना बोलू नये.टीव्ही पहात बसू देऊ नये. जेवणाच्या वेळा ठराविक असावेत. शक्य असल्यास जेवताना गरम पाणी प्यावे. जेवणात आलं लिंबू वापरावे.