पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग) – राज्याच्या कृषी मंत्र्यांकडून कृषी, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटना यांच्या कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ न भेटलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याकरता केलेल्या मागणीची दखल व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेच्या वतीने व अध्यक्ष या नात्याने मी ,सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील महाराष्ट्रातील कृषी महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षामध्ये शिकत असलेल्या काही विद्यार्थ्यांना सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनांचा विद्यार्थ्यांना अजून पर्यंत लाभ मिळालेला नाही .
याबाबत आम्ही 25 सप्टेंबर 2020 रोजी राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना पत्रान्वये कळवले होते याची दखल माननीय मंत्री महोदयांनी घेतली असून , त्यांचा आम्हाला ई-मेल द्वारे 4 नोव्हेंबर 2020, रोजी प्राप्त झाला असून वरील विषयास अनुसरून शिष्यवृत्ती कार्यवाहीसाठी जावक क्रमांक 2344 द्वारे आपणाकडे पाठवले आहे, कोरोनाच्या काळात विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण थांबू नये यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद ने सहकार्य करून सर्व विद्यार्थांच्या खात्यामध्ये त्वरित या योजनेची रक्कम जमा करावी ही आपणास माझ्यासमवेत संघटनेचे सचिव गणेश बाबर, खजिनदार विठ्ठल रांजणे, उपाध्यक्ष मिलिंद यादव सोळस्कर, सदस्य जयवंत पवार, लक्ष्मण निंबाळकर, प्रदीप आर्यमाने, संजय जाधव ,ऋतुराज फडतरे, पश्चिम महाराष्ट्र विभागीयअध्यक्ष रणजितसिंह देशमुख ,समन्वयक मंगेश निंबाळकर ,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सचिन कारेकर ,सातारा जिल्हाध्यक्ष संतोष यादव सोळस्कर, युवा नेते ऋषिकेश मस्के, युवा नेते सर्वजीत बोंडगे, योगेश वेदपाठक, महेश गोळे, सातारा जिल्हा समन्वयक अश्विनी करे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष ऋतुजा भोसले, युवा नेत्या प्रज्ञा जाधव, सोनाली शिंदे ,मोनाली शिंदे ,करिष्मा मनेर, सलोनी वाला ,अमृता बोबडे, अंजली कोरडे ,सई मोहिते, राजश्री गायकवाड ,आरती वाघ ,प्रतिक्षा भिसे ,दिपाली जगताप, रंभा गोफने , तृप्ती भोसले सायली शिंदे, रोशनी मोहिते ,नेहा भोंगाळे ,आश्लेषा शेलार, प्रतिक्षा गोसावी, सलोनी पाताडे , राजेश्वरी काळे, अदिती थोरात, प्राजक्ता पवार ,सुकन्या मंथाले आदी जण करत आहोत तरी आपण विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती तात्काळ जमा करावी.