अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडन यांनी आपल्या ट्रान्झिशन टीममध्ये 20 हून भारतीय वंशाच्या नागरिकांना स्थान दिले आहे.
यापैकी तीन भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक एजन्सी रिव्ह्यू टीमचं नेतृत्त्व करतील. ही टीम सत्तेचे हस्तांतरण सुनिश्चित करण्यासाठी सद्य प्रशासनातल्या प्रमुख फेडरल एजन्सींच्या कामकाजाचा आढावा घेईल. भारतीय वंशाचे हे सदस्य अमेरिकेतील व्यवस्थेत मोठे बदल घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. अमेरिकेत नवे राष्ट्रपती आपल्या एजन्सी रिव्ह्यू टीम अर्थात आर्ट बनवतात. जेणेकरुन शपथविधीनंतर तातडीने काम सुरु करता येईल.
अरुण मजुमदार, अतमन त्रिवेदी, अनिश चोप्रा, राहुल गुप्ता, अरुण वेंकटरमण, राज डे, किरण अहुजा, सीमा नंदा, राज नायक, सुभाश्री रामनाथन, शीतल शाह, आर रमेश, रामा झाकिर, रीना अग्रवाल, सत्यम खन्ना, भव्या लाल, दिलप्रीत सिद्धू, दिव्य कुमारियाह, कुमार चंद्रण, पुनीत तलवार, पाव सिंह या भारतीय वंशाचा नागरिकांचा जो बायडन यांच्या टीममध्ये समावेश असल्याचे सांगितले जात आहे.