चिखली,(महाराष्ट्र ब्रेकिंग) – माणसाचा जन्म हा समाज,राष्ट्राच्या उन्नतीसाठी असावा अशी अपेक्षा असते.स्वतःसाठी तर प्रत्येक जण झटत असतो आणि या मायाजालाचे भेदन करून समाजातील गरीब, उपेक्षित हेदेखील आपलेच बांधव आहेत असे आयुष्य जगणारे समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात. कुदळवाडी भागातील स्विकृत नगरसदस्य दिनेश यादव यांच्या रूपाने असेच प्रेरक व्यक्तिमत्व अनेकांना मदतीचा हात देऊन समाजाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
कुदळवाडी मधील लता मोरे या महिलेला जन्मजात वळसा घातला होता आणि त्यामुळे त्यांचा एक हात निकामी झाला होता.लता भाधवराव मोरे या भंगार व्यवसायात मजुरी करून आपली उपजीविका चालवतात आणि एक हाताने काम करणे त्यांना जिकिरीचे जात होते. काही कार्यकर्त्यांनी दिनेश यादव यांना त्यांच्या आजाराची माहिती दिली आणि मोरे यांना प्रत्यक्षात भेटून दिनेश यादव यांनी आजाराबाबत जाणून घेतले.त्यानंतर आजारावर उपाय शोधण्याचा त्यांनी निश्चय केला,त्याकरिता आमदार महेश दादा लांडगे युवा मंच आणि स्पार्क मिंडा ग्रुप यांच्या मदतीने महिलेला हात बसवण्याचे निश्चित केले गेले.त्यानुसार लता मोरे यांचा इलाज करून यशस्वीपणे हात बसवून घेण्यात येऊन महिलेला नवजीवन मिळाले आहे.सदर महिलेला हात नसल्याने जीवनात ज्या काही समस्या येत होत्या त्याचे निराकरण झाल्याने महिलेच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती.दिनेश यादव यांना भेटून तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आणि त्यांच्या रूपाने साक्षात ईश्वराने आपले जीवन बदलल्याची भावना व्यक्त केली.
दिनेश यादव यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी अभिनंदन केले असून,समाजाला अशा लोकांची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.यावेळी सुमित लवाळे,सना दमानिया
काका शेळके ,किशोर लोंढेयांचे सहकार्य लाभले.
